नवी दिल्लीः करोना व्हायरसचा प्राद र्भाव रोखण्यासाठी लाकडाऊन वाढवण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे येत्या सोमवारपासून केंद्रीय मंत्री सत्यमेव जयते पुन्हा काम सुरू करतील, असं सांगण्यात येतंय. लांकडाऊनमुळे घरातून काम करणारे सर्व केंद्रीय मंत्री आता सोमवारपासून मंत्रालयात येऊन काम करतील. यासोबतच अधिकारीही मंत्रालयातून पुन्हा काम सुरू करतील, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं पीटीआयने म्हटलं आहे. __ केंद्रीय मंत्र्यांसह संयुक्त सचिव आणि त्यावरील उच्च पदांवर असलेले अधिकारी सोमवारपासून मंत्रालयातून काम करतील. सर्वच कर्मचाऱ्यांना ही सूचना नाहीए. पण आवश्यक असलेल्या एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना मंत्रालयातून काम करण्यास सांगण्यात आलंय, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी घोषित केलेला २१ दिवसांचा लाकडाऊन १४ एप्रिलला संपणार आहे. पण हा लाकडाऊन वाढवण्याची मागणी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केल्याने तो ३० एप्रिलपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही शक्यता व्यक्त होत असताना पंतप्रधान मोदींनी सर्व मंत्र्यांना मंत्रालयातून पुन्हा कामकाज सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सोमवारपासून मंत्रालयातून काम सुरू करा, मोदींची मंत्र्यांना । सूचना, सूत्रांची माहिती
• Thane Darshan Team