___कल्याण रेल्वे स्थानकाजवळील पत्रीपुलाजवळ लोकलच्या धडकेत शनिवारी वडील आणि मुलीचा मृत्यू झाला. रेल्वे मार्ग | ओलांडताना हा अपघात झाला. अर्शद खान (४०), आयेशा (८) अशी मृतांची नावे आहेत. गोविंदवाडीमध्ये खान कुटुंबीय राहत होते. । आयेशा के. सी. गांधी शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिक्षण घेत होती. तिला । शाळेत रिझर्व्ह बँक विषयावर प्रकल्प करायचा होता. त्यामुळे बँकपाहण्यासाठी ते शनिवारी दुपारी मुंबईला गेले होते. तेथून परतताना ते - पत्रीपुलाजवळ उतरले असता अपघात झाला.
लोकलच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू