पाणी पुरवठा आदेशानंतर होणार सुरू

डोंबिवलीमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वायागेले. ही पाईपलाईन डोंबिवलीतील खंबाळपाड्यापासून सावित्रीबाई -नाट्यगृहापर्यंत जाते. पाईप फुटल्यामुळे डोंबिवली पूर्वेकडील पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. आज सकाळी या पाईपलाईनचा एअर व्हॉल्व फुटला. लाखो लिटर पाणी वाया गेले. डोंबिवलीत खंबाळपाडा परिसरात फुटलेली ही पाईपलाईन ११ वाजण्याच्या सुमारास दुरुस्त करण्यात आली आहे. तोपर्यंत पाणी वाया जात होते. पाईपलाईन दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असलं तरीही पुढील सूचना मिळेपर्यंत पाणी पुरवठा बंदच राहील, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.